Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मुंबई ते हैद्राबाद,पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र जालना,नांदेड,नाशिकला मोठा फायदा
मुंबई ते हैद्राबाद,पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र जालना,नांदेड,नाशिकला मोठा फायदा
मुंबई दि २७: मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक लाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकाना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीड ने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकाना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा