Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरातील अंबिका नगर मधील अतिक्रमण हटवा अन्यथा उपोषणाचा नागरिकांच्या इशारा..!
शिरपूर शहरातील अंबिका नगर मधील अतिक्रमण हटवा अन्यथा उपोषणाचा नागरिकांच्या इशारा..!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील अंबिका नगर मधील नागरिकांनी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला आज दिनांक 24 रोजी निवेदन दिले असून यात अंबिकानगर मधील अतिक्रमण हटवा अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा दिला आहे.
सदरच्या निवेदनात असे नमूद केले आहे की शिरपूर वरवाडे नगर परिषद हद्दीतील अंबिकानगर हा भाग पूर्णतः अतिक्रमण ग्रसित असून या ठिकाणी काही महाभागांनी आपल्या स्वार्थापोटी एक-दोन नव्हे तर तब्बल दहा फुटांपेक्षा जास्त अंतराचे रहदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण केले आहे.
सदर बाबतीत दुकानदाराच्या नावानिशी अनेक वेळा नगरपरिषद यांना तक्रारी अर्ज देण्यात आला आहे परंतु अद्याप शिरपूर-वरवाडे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही,त्यामुळे सदर अतिक्रमित दुकानदारास कोणाच्या आशीर्वाद आहे का? किंवा तो कोणत्या राजकीय पक्षाच्या समर्थक आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित राहत असून याठिकाणी अनेक वेळा अतिक्रमित दुकानांमुळे अपघात झालेले असताना शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
आणि म्हणून आज पुन्हा शिरपूर वरवाडे नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात सदरची अतिक्रमण तात्काळ हटवण्याबाबत विनंती केली असून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास अंबिका नगर परिसरातील सर्व नागरिक दिनांक 27 सप्टेंबर रोजी शिरपूर वरवाडे नगर परिषद च्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी अंबिका नगर परिसरातील नीलेश मराठे,किरण मोरे,जयेश पाटील, शेखर कोळी,रमेश चव्हाण,दीपक शिंपी, वावड्या पाटील,पंकज सोनवणे,गोपीचंद बारी,राकेश बारी,संतोष पाटील,मुकेश शेटे,हर्षल बारी,विजय शेटे,कुणाल पाटील इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा