Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

डोंबिवली बलात्कार अनेक आरोपी सत्ताधारी व विरोधक राजकीय पुढाऱ्यांची मुले भाजप नगरसेविकेचा तर पोलिसांवर फोन करून दबाव



डोंबिवली :-१५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर २९ जणांनी मागील ९ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून २ अल्पवयीन आरोपींसह २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, उर्वरित ६ आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अमानूष घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुतांश आरोपींचे पालक हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने पोलिसांवरची जबाबदारी वाढली आहे.

कल्याणमधील पुढाऱ्यांची मुले असल्याचा संशय:-

कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना, भाजप,मनसे,राष्ट्रवादी या राजकीय पक्षांतील पुढाऱ्यांची मुले यात आरोपी असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे उघड केली नाहीत.दरम्यान, पीडितेला उपचारासाठी कळवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर आहे.

आरोपींनी अटक झाल्याची माहिती मिळताच शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट देऊन या दबावतंत्राची चुणूक दाखवली. भाजपच्या नगरसेविकेने तर पोलीस ठाण्यात फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.गुन्हेगारांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असल्याने राजकीय हस्तक्षेप होण्याची भीती आहे.शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर काही मीडियाची गर्दी पाहून आल्या पावली माघारी फिरले. एका राजकीय पदाधिकाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावून आपला चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.

आरोपी मुलांच्या पालकांचं म्हणणं काय?

आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती. आमची मुले निष्पाप असून त्यांना या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचा आरोप आरोपींच्या पालकांनी केला.

पीडित मुलीने ओळखत नसल्याचे सांगूनही मुलांना पोलिसांनी आरोपी केल्याचा दावा काही पालकांनी केला. मुले लहान असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले.

माझा मुलगा आजारी असतानाही त्याला घरातून झोपेतून उठवून पोलिसांनी नेले, असे एका पालकाने सांगितले. जानेवारीपासून अत्याचार सुरू होते मग तेव्हाच पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध