Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
ज्ञानमाऊली रोटरी ग्रामसेवा केंद्र वरणगे पाडळी च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण;अध्यक्ष परशराम आंबी प्रास्ताविक केले
ज्ञानमाऊली रोटरी ग्रामसेवा केंद्र वरणगे पाडळी च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण;अध्यक्ष परशराम आंबी प्रास्ताविक केले
आजच्या शिक्षक दिनानिमित्त निवडलेल्या गुणवंत शिक्षकांचा ज्ञानमाऊली रोटरी ग्रामसेवा केंद्र वरणगे- पाडळीच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण रोटरी क्लब आँफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष सचिन मालु , दयानंद देवमोरे आणि योगेश रास्ते यांच्या हस्ते करण्यात आले
पुरस्कार विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे
१.सौ.मानसी सुधीर माने
सहा.शिक्षिका,देशभूषण हायस्कूल,कोल्हापूर
२. सौ.नीता दिलीप ठोंबरे
मुख्याध्यापक ,शिवराज विद्यालय, कोल्हापूर
३.श्रीकांत कृष्णात वरुटे
सहा.शिक्षक.विद्यामंदिर पाडळी बु.
ता.करवीर
४.अमित केरबा कांबळे
सहा. शिक्षक गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर
५. प्रणिता चंद्रशेखर तेली
सहा. शिक्षिका क.आरळे ता. करवीर
६. बिराप्पा सोमराया हाक्के
सहा.शिक्षक जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर
७.सचिन सखाराम यादव
सहा.शिक्षक हणमंतवाडी हायस्कूल, हणमंतवाडी
त्याचबरोबर महापूर काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वरणगे पाडळी गावातील वायरमन यांचा सत्कार करण्यात आला
सत्कारमूर्ती सौ.मानसी माने आणि अमित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज् यांचेमार्फत गरजूंना 100 चटई व 70 सौर कंदील यांचे वितरण करण्यात आले
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष सचिन मालु यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे संयोजन उत्तम नलवडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीरंग कुंडले यांनी केले राजेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सरपंच अनिता पाटील,
विनायक शिंदे अविनाश नलवडे, मुख्याध्यापक शंकर वनारे,पूजा पाटील,स्वप्नील कनोजे,उज्वला ठोके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा