Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

शिरपूरला अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी विद्यानगरी, उद्योगनगरी मध्ये परिवर्तित केले, ही फारच अभिमानाची व भूषणावह बाब माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूरला अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी विद्यानगरी, उद्योगनगरी मध्ये परिवर्तित केले,ही फारच अभिमानाची व भूषणावह बाब आहे. डोळ्याचे पारणे फिरावे अशा सर्व शाळा, शाखा निर्माण केल्या आहेत.आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रातील व देशातील मॉडेल आश्रमशाळा भाईंनी निर्माण केली.शासन चालविताना आम्ही देखील अनेक चांगल्या योजना सुरू केल्या.परंतु भाईंचे कार्य अफाट आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी मोठे काम केले. मिलिटरी स्कूल अतिशय आदर्श व दर्जेदार आहे. “शिरपूर 60” हा अभिनव प्रोजेक्ट भाईंनी सुरु करुन आदिवासी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.येथील आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न भाई करत आहेत.“शिरपूर 60” हा पथदर्शी कार्यक्रम आहे.अमरिशभाई व भूपेशभाई यांचे फार डेडिकेशन,योगदान आहे. देशातील बेस्ट व्यवस्था भाईंकडे आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याचे काम संस्थेत होत आहे.भाई यांच्या प्रयत्नाने

येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून मेरीट मध्ये तडजोड करत नाहित. जागतिक दर्जाच्या कामासाठी भाईंचे अभिनंदन.वर्ल्ड क्लास स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदर्श कल्पना शिरपूर येथे प्रत्यक्ष अमलात आणली. शिरपूर पॅटर्नचा अभ्यास करून आम्ही गेल्या वेळी शासना तर्फे जलयुक्त योजना सुरु करुन यशस्वी पणे राबविली. त्याचे दृश्य चांगले परिणाम दिसत आहेत. शिरपूर पॅटर्न देशभरात प्रसिद्ध झाला. टेक्स्टाईलचे काम देखील उत्कृष्ट, 100 टक्के माल परदेशात निर्यात होतो.भाई हे सर्वांगीण विकास करणारा नेता आहेत.भाई यांच्या सारखे दृष्टी असलेले नेते लाभणे आपले भाग्य,भाई आपल्यासोबत आहेत, हे आपले भाग्य आहे.शिरपूर च्या आजच्या कार्यक्रमात आम्हाला ऐतिहासिक अनुभव मिळाला असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित असली ता. शिरपूर येथील आर. सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या नूतन शैक्षणिक दालनाचे उद्घाटन सायंकाळी ५.३० वाजता तसेच श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर.पटेल सैनिकी शाळेच्या नूतन शैक्षणिक दालनाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता,तांडे ता.शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलच्या भव्य इमारतीचे उद्घाटन सायंकाळी ६.३० वाजता, श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील इनडोअर स्टेडियम या भव्य क्रीडा दालनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता करण्यात आले.

(यावेळी व्यासपीठावर)

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशभाऊ महाजन,आमदार अमरिशभाई पटेल,माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित,माजी पर्यटन व रोहयो मंत्री आमदार जयकुमार रावल,धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, शहादा-तळोदा आमदार राजेश पाडवी,माजी मंत्री योगेश सागर मुंबई, रवींद्र अनासपुरे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबार, धुळे महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, सुभाष देवरे,धुळे महानगर भाजपा अध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष नारायण पाटील,नंदुरबार जिल्हा भाजपा अध्यक्ष विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष दिपक पाटील, सौ. कुसुमताई निकम, सुरेश भामरे पाटील, श्री विले पार्ले केळवाणी मंडळचे जॉइंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल, ट्रस्टी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण,भार्गवभाई पटेल,विवेक वैद्य, गिरीजा मोहन, सीईओ डॉ उमेश शर्मा, संस्था लेखापाल राहुल दंदे, प्राचार्य पी. सुभाष, दिनेशकुमार राणा, निश्चल नायर उपस्थित होते.

मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम संपन्न झाला, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात आले. प्रास्ताविकात आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, एस. व्ही. के. एम. मार्फत देशभरात अनेक कॅम्पस सुरु केले असून “शिरपूर 60” उपक्रम यशस्वीपणे राबवित आहोत. पाण्याचे काम शहरात विना मोटर पाचव्या मजल्यापर्यंत पाणी पोहचते. शिरपूर वरवाडे नगर परिषद महाराष्ट्रात सर्वोत्तम बनवली. शिरपूर एज्युकेशन सोसायटी मध्ये तालुक्यातील 35 हजार व एस. व्ही. के. एम. मध्ये देशभरात 1 लाख विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. आर सी पटेल शैक्षणिक संकुलाचे 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले ही अभिमानाची बाब आहे.

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने अनेकदा निधी प्राप्त झाला,त्यांचे मनापासून आभार.

माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मी देशात,जगात फिरलोय पण मुंबई, पुणे येथे शक्य नाही असे शिरपूरचे कॉम्प्लेक्स आहे.येथील विद्यार्थी भाग्यवान आहेत. विकास पुरुष अमरिशभाई पटेल यांच्या कार्याचा महिमा अफाट आहे.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले,भाईंनी जागतिक दर्जाचे कॅम्पस शिरपूर येथे निर्माण केले. डोळ्यांचे पारणे फिटले, फार मोठी व्यवस्था दर्जेदार शिक्षण, गुणवत्ता,शब्द अपुरेबोलायला. भाईंच्या कार्याला मनापासून सलाम. भूपेशभाई यांचेही कौतुक,सर्व क्षेत्रात भाई यांनी प्रगती केली.भाई म्हणजे आश्चर्य, भारतात आपल्या पाण्याच्या कामाला तोड नाही, सूतापासून विमानापर्यंत भाईंनी शिरपुरात आणले. 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला. भाई आपल्याकडून शिकण्यासारखे खूप आहे, भाई हे आज भाजपाचे कोहिनूर हिरा आहेत, भाईंचे कार्य अफाट.सूत्रसंचालन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकरराव चव्हाण यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री विले पार्ले केळवाणी मंडळचे जॉइंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल,व्हाईस प्रेसिडेंट चिंतनभाई पटेल व सर्व ट्रस्टी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण व सर्व संचालक यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध