Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
ठाणे पालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्यानं संताप व्यक्त..!
ठाणे पालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्यानं संताप व्यक्त..!
याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.खोटं आयकार्ड देऊन लस देणं, एकाच महिलेला 3 वेळा लस देणं अशा संतापजनक प्रकरणानंतर देखील ठाणे महापालिकेतील असे प्रकार थांबत नाही. कारण काल (मंगळवारी) पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे महानगर पालिका कळव्यातील आतकोनेईश्वर विभागात एक आरोग्य केंद्र चालवते.याच केंद्रामध्ये कोरोनाचं लसीकरण देखील सुरु असल्यानं,एक व्यक्ती कोरोना लस घेण्यासाठी 27 तारखेला गेली होती. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी त्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून त्याला लस घेण्यासाठी परिचारिकेकडे पाठवलं.मात्र परिचारिकेनं त्या व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी न करताच त्याला थेट रेबीजचं इंजेक्शन देऊन टाकलं. ही गंभीर बाब काही वेळानंतर सर्वांच्या लक्षात आली.महापौर नरेश म्हस्के यांना हे प्रकरण समजताच त्यांनी काल ठाणे महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीत आरोग्य विभागातील आणि पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेनं ताबडतोब कारवाई करत या दोघींना निलंबित केलं आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
जेव्हापासून लसीकरण सुरु झालं आहे तेव्हापासून ठाणे महापालिका क्षेत्रात घडलेली ती तिसरी धक्कादायक घटना आहे. याआधी पालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात खोटं ओळखपत्र बनवून 21 जणांना लस देण्यात आली होती. यात एका अभिनेत्रीचा देखील समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या एका आरोग्य केंद्रात एका महिलेला तीन वेळा लस देण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा