Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासण घाटात भीषण अपघात 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक, 3-4 जणांचा जागीच मृत्यू
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासण घाटात भीषण अपघात 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक, 3-4 जणांचा जागीच मृत्यू
शिरपूर प्रतिनिधी :- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.एकाच वेळी 7 ते 8 वानहांनी धडक दिली आहे. बिजासण घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली तर इतर जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात चारचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासण घाटात भीषण अपघात घडल्याणी माहिती समोर आली आहे. आज दि 27 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूर अडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. या अपघातात लगोपाट 7 ते 8 वाहनांनी मागच्या बाजूंने धडक देत अपघात घडला. यात तिन ते चार चार चाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे.घटनेत चारचाकींचा वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्र देखील दाखल होत मदतकार्य सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू तर ईतर जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा