Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१
RSS प्रणित भाजप केंद सरकार सरकारची महाराष्ट्राला सापत्न वागणूक का दिली जाते
मुंबई : महाराष्ट्रद्वेषी मराठीद्वेषी भाजप केंद्रात असल्याचा जबरदस्त फटका महाराष्ट्राला बसला आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला तब्बल ८०,१६४.७७ कोटी रुपये येणे बाकी आहे.या रकमेत अजून आदिवासी विभागाच्या योजनांपोटी मिळणाऱ्या रकमेचा समावेश नाही.
● महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी महाराष्ट्र द्वेषी RSS प्रणित केंद्र सरकार सोडताना दिसत नाही; हे यावरुन स्पष्ट होत आहे.
● हक्काचे मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळत नसल्याने राज्याला कॅश फ्लो सांभाळणे जिकीरीचे झाले आहे, असे सांगून वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, रुग्णाला जेव्हा चांगल्या उपचाराची गरज आहे तेव्हा त्याच्या औषधासाठी पैसे नाहीत आणि रुग्ण मरणाच्या दारात असताना त्याला भरुपूर पैसे देऊन औषध आणा, असे सांगण्यासारखे महाराष्ट्र द्वेषी RSS प्रणित केंद्राचे राज्याशी वागणे आहे.
● या राजकारणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे कधीही न भरुन येणारे नुकसान म्हणजेच पर्यायाने देशाचेही नुकसान होत आहे असेही ते म्हणाले.
● जमा होणाऱ्या एकूण करातून केंद्र सरकार ५८ % आणि विविध राज्यांना ४२ % रक्कम दिली जाते. त्याचे वाटप १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार होते.
आजारी व गरीब राज्यांना ४२ टक्के रक्कमेतील जास्त वाटा दिला जातो. महाराष्ट्राला सगळयात जास्त कर देऊनही त्यांना फक्त ५.२१ टक्केच रक्कम दिली जाते.
● पण गेल्या वर्षापासून ती रक्कमही पूर्ण दिलेली नाही. केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा म्हणून फेब्रुवारी २०२१ पर्यंत महाराष्ट्राला ४८,१०९ कोटी रुपये दिले जातील अशी तरतूद केंद्राने त्यांच्या अर्थसंकल्पात केली होती. प्रत्यक्षात आजपर्यंत २७,२४९ कोटी रुपयेच मिळाले. त्यामुळे २०,८६० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय अंदाजानुसार तूट झाल्याने राज्याचे तेवढे नुकसान झाले आहे.
● हीच परिस्थिती वस्तू व सेवा कराच्या नुकसान भरपाईपोटी झाली आहे. जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार राज्य शासनाने स्वत:च्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून केंद्राकडे पाठवलेल्या दाव्यांची रक्कम ४६,९५० कोटी आहे. प्रत्यक्षात त्यातील ६१४० कोटी रुपये सेस (उपकरातून) मधून दिले आणि ११,५२० कोटी रुपये कर्ज म्हणून दिले. अजूनही २९,२९० कोटी रुपये केंद्राने दिलेले नाहीत.
● केंद्राकडून राज्याला कर आणि कराशिवायचा महसूल मिळतो. त्याशिवाय सहाय्यक अनुदाने देखील दिली जातात. ही अनुदाने किती दिली जातात यावरुन महाराष्ट्रद्वेषी भाजप प्रणित केंद्र सरकार महाराष्ट्राला कशी खालच्या दर्जाचीवागणूक देते हे लक्षात येते.
● केंद्रीय अर्थसंकल्पानुसार राज्याला ५३,७७० कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळणे अपेक्षीत होते. त्यापैकी आजपर्यंत फक्त ३३,६१० कोटी रुपये दिले गेले, २०,१६० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. त्याशिवाय करेतर महसुलामध्ये सुध्दा राज्याच्या हक्काचे ९,०५४ हजार कोटी रुपये केद्राने दिलेले नाहीत.
● मार्च २०१८ चे पैसे डिसेबर २०२० मध्ये एकात्मिक आंततरराज्यीय जीएसटी करापोटी मिळणारा राज्याचा ८५०० कोटींचा हिस्सा महाराष्ट्राला ३१ मार्च २०१८ पर्यंत मिळायला हवा होता. पण ही रक्कम डिसेबर २०२० मध्ये म्हणजे जवळपास पावणे दोन वर्षांनी मिळाली.
● या ८५०० कोटींचे त्या दिवशीचे मुल्य आणि आजचे मुल्य यात फरक तर आहेच, शिवाय ही रक्कम वेळेवर मिळाली असती तर त्याचा कॅश फ्लोसाठी फायदा झाला असता. 'ऑपरेशन चांगले झाले पण रुग्ण दगावला' अशी ही स्थीती असल्याचे वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
*केंद्राचे राज्याला येणे तरी किती ?*
(आकडे कोटीत)
*-केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा- २०,८६०*
- वस्तू व सेवा कराची नुकसानभरपाई :२९,२९०
सहाय्यक अनुदानाची थकीत रक्कम - २०,१६०
- करेतर महसूलाचे राज्याचे पैसे - ९,०५४
अंगणवाडी योजना : ५३९.२७
- विशेष केंद्रीय सहाय्ये :५६
- केंद्रीय अनुदान कलम २७५ (१): ५०
- पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप : १४६
- पीव्हीटीजी अनुदान: ७.५०
एकूण येणे ८०,१६४.७७ कोटी
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा