Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जून, २०२६

सिन्नर पोलीसांकडुन चैन स्नॅचींगचे ०३ गुन्हे उघड.




उपसंपादक :- माधव खाबिया                                
सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी  पोलीस अधिक्षक डी. एस. स्वामी यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने  अपर पोलीस अधिक्षक विमला. एस. नाशिक ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संदीपकुमार बोरसे, पोलीस निरीक्षक, सिन्नर पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या. दि ११/०५/२०२६ रोजी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगिर यांचे विवाह असलेल्या आशिर्वाद लॉन्स, घोरवड ता सिन्नर येथे रात्री १०/०० वा च्या सुमारास लग्नसमारंभ आटोपुन त्यांचे नातलग महीला ही घरी जाण्यासाठी शिर्डी घोटी हायवे रोड क्रॉस करीत असतांना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात ईसमांनी त्यांचे गळयातील सुमारे ०६ तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढुन घेवुन गेले होते. सदर महीलेचे तक्रारी प्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेत । गु र नं ३६५/२०२६ बीएनएस ३०४(२)३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी सिन्नर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांना नाउघड चैन स्नॅचींगचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार यांनी फिर्यादी यांचेकडुन मिळालेले आरोपीतांचे वर्णन व विविध ठीकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपीतांची ओळख पटविली व यातील निष्पन्न झालेला रेकॉर्डवरील संशयित ईसम अनिल सुभाष चिंतामणी, वय-२९ वर्षे, रा. वडाळामहादेव ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर यास सापळा रचुन अशोकनगर, श्रीरामपुर येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे प्रकाश गोनके रा उभाडे ता ईगतपुरी जि नाशिक याचेसह सिन्नर शहर, घोरवड ता सिन्नर व शिर्डी जि अहिल्यानगर येथे मोटारसायकलवर जावुन पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळी, पोत चोरी केल्याची कबुली दिलेली आहे.सदरचे गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीताकडुन एकुन ३८.०७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याची लगड एकुन किंमत रु ४,५९,५३४ जप्त करण्यात आलेली आहे.यातील ताब्यता घेतलेला आरोपी अनिल सुभाष चिंतामणी, वय-२९ वर्षे, रा. वडाळामहादेव. ता श्रीरामपुर. जि. अहिल्यानगर याने खालील गुन्हयांची कबुली दिलेली आहे. यातील अटक आरोपीतावर अहिल्यानगर, नाशिक, नाशिक शहरात यापुर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.पैकी १. सिन्नर पोलीस ठाणे । गुर नं. ३६५/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०४(२) ३(५) प्रमाणे २. सिन्नर पोलीस ठाणे । गुरनं ३९८/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०४ (२) ३(५) प्रमाणे ३. शिर्डी पोलीस ठाणे जि अहिल्यानगर । गु.र.नं.५१७/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०४(२) ३(५) प्रमाणे सदर कारवाई नाशिक ग्रामीण मा. पोलीस अधिक्षक डी.एस. स्वामी अपर पोलीस अधिक्षक विमला. एस. नाशिक ग्रामीण,उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील सो यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांचे आदेशन्वये गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे यांचे पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणुन कामगीरी केलेली आहे. पुढील तपास मउपनिरी मनिषा राउत या करत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध