Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
ज्येष्ठ नागरीकसंघाच्या कार्यक्रमात 'स्वरानंदचा स्वराविष्कार'
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर,आशा भोसले सुमन कल्याणपुरकर यांच्या गीतांसोबतच किशोर कुमार यांचे मस्तीभरे गीत,मन्ना डे यांची सुमधूर गीते आणि मराठी भावगीत व गीतांचा तडका असा भरपूर सुरेल खजाना कोल्हटकर दाम्पत्यांनी रसिकांसमोर दि.24/ 11 रोजी बुधवारी सादर केला आणि रसिक भारावून गेले.
ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली पश्चिम आयोजित व स्वरानंद संगीत अकादमी प्रस्तुत 'गीत संगीत' हा सुमधूर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. हेडगेवार सभागृह विवेकानंद हायस्कूल डोंबिवली पश्चिम येथे सादर झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर जकातदार हे होते. तर कार्यक्रमाची संकल्पना पुंडलिक कोल्हटकर यांची होती.
प्राजक्ता कोल्हटकर व पुंडलिक कोल्हटकर या गायकांनी विविध गीते सादर केली. वातावरणात हळूहळू संध्याकाळचा गारवा , आणि त्यात रसिकांची दाद कार्यक्रमाला रंगत येत होती. सुरुवात ओमकार प्रधान या श्री गणेशाच्या गाण्याने सुरुवात झाली त्यानंतर जय शारदे वागेश्वरी सरस्वती मातेस वंदन प्राजक्ता ने सादर केले. त्यानंतर केव्हा तरी पहाटे हे गीत सादर करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या. 'सखी मंद झाल्या तारका...' हे पुंडलिक कोल्हटकर यांनी सादर केले, तर 'छुप गये सारे नजारे...' हे द्वंद गीत सादर करून त्यांनी रसिकांना हिंदी मराठी सादर केलेल्या गीतांची सुमधूर सफर घडवली.
या कार्यक्रमात क्रमाक्रमाने अनेक अशी सुंदर गाणी या दाम्पत्यांनी सादर केली त्यात दिवे लागले रे ,सांज ये गोकुळी,तोच चंद्रमा नभात,चंद्र आहे साक्षीला नारायणा रमा रमणा,राधा कृष्णावरी भाळली,केतकीच्या बनी तिथे,कानडा राजा पंढरीचा ,जब दीप जले आना ,आजा सनम मधुर चांदनी में
अशी एकाहून एक सरस गीते गायकांनी यावेळी सादर केली. पुंडलिक कोल्हटकर यांनी सादर केलेल्या 'कैवल्याच्या चांदण्याला' गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.आशा कवठेकर यांनी आपल्या खुसखुशीत निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संगीत संयोजन पुंडलिक कोल्हटकर यांचे होते.
साथ संगत तबला अवधूत पाटील कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व दर्दी सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुरेश बक्षी व श्रीपाद कवठेकर यांचे विशेष सहकार्य होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा