Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था मार्फत लसीकरण शिबिर ! नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसाद...



वाघाडी (प्रतिनिधी) :-
आज दिनांक 26/11/2021 रोजी संविधान दिनानिमित्त व शहीद दिनानिमित्त वाघाडी येथील श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात होते सदर लसीकरणास गावातील सर्व स्तरातील वयो गटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आज सकाळपासूनच सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली असताना 130 लोकांनी लसीकरण करून घेतले ही एक खूप अत्यंत समाधानाची व जागरूक नागरिकांची सुचक दिसून येते घेतलेल्या कार्यक्रमाचे परिसर परिसरातील सुजाण नागरिकांनी कडून व प्रतिष्ठित व्यक्तींकडून कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल, वैघकीय अधिकारी डॉ विनोद पाटील, वैघकीय अधिकारी डॉ पुनम बडगुजर, आरोग्य सहाय्यक श्री जी डी निळे तालुका पथक सदस्य छोटु शिरसाठ, आरोग्य सेविका श्रीमती संगिता चव्हाण, आरोग्य सेवक श्री प्रदीप बागल, गटप्रवर्तक श्रीमती भावना बोरसे, तसेच सर्व आशा कर्मचारी व
श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पुनमचंद मोरे, सचिव सौ.उषाबाई भोई, उपाध्यक्ष ईश्वर भोई, सदस्य विक्की मोरे, मयुर कोळी, ज्ञानेश्वर कोळी, व आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध