Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
खान्देशातील स्वप्न या चित्रपटाला ६ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवामध्ये २पारितोषिक जाहीर.
खान्देशातील स्वप्न या चित्रपटाला ६ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवामध्ये २पारितोषिक जाहीर.
जळगाव प्रतिनिधी :६ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्स मुंबई महराष्ट्रातील काही महत्वाच्या महोत्सवा पैकी ऐक मानला जातो.या मध्ये खुप सारे मराठी चित्रपट येतात.६ व्या महोत्सवामध्ये तब्बल १६७दिग्गज चित्रपटांनी आपले नाव नोंदविले होते त्यातील परीक्षकांनी निवडलेले काही चित्रपट हे उत्तीर्ण होतात.सर्वात आधी नामांकन जाहीर झाले होते त्यात प्रदीप भोई लिखित व दिग्दर्शित स्वप्न या चित्रपटाला तब्बल ६ नामांकन प्राप्त झाले होते.
आणि आज लागलेल्या निकाला नुसार स्वप्न चित्रपटाला २ पुरस्कार प्राप्त झाले आहे.१६७ चित्रपटा पैकी खान्देशातील स्वप्न चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार जाहीर झाला व तसेच चित्रपटातील बाल पात्र करणारे गौरव अहिरराव याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
चित्रपटाचा विषय सामाजाला वेगळीच चालना देणारा आहे.कचरा वेचणारी मुलं यांचा शिक्षणासाठीचा लढा.सामाजिक शिक्षण संस्था आहे बाल सुधारगृह आहे.म्हणजे खुप साऱ्या शिक्षण संस्था या मुलांना शिक्षण मिळाव या साठी खुप वर्षा पासूण प्रयत्न करीत आहे तरी देखील ही मुलं शिक्षणा पासून दूर का ? हा मोठा प्रश्ण लेखकाने मांडला आहे.तसेच त्या मुलांचे आमली पदार्थांचे सेवन का करतात व शारीरिक व लेंगिक छळ या विषयावर ही प्रकाश लेखकाने टाकला आहे.
स्वप्न चित्रपटाचे कथा पटकथा व संवाद आणि दिग्दर्शन प्रदीप यांचे असुन चित्रीकरण गौभाग्य सेनापती यांनी केले आहे संकलन चेतन पाटील यांचे असुन पार्श्वभूसंगीत रुपेश मेहरा यांचे आहे.तसेच गीत संगीतबद्ध रोहित नागभिडे यांनी केले असुन गायक आदर्श शिंदे व दिव्या कुमार आणि मंगेश जोशी यांनी केले आहे.
व गीतकार म्हणून प्रशांत मडपूवार व प्रदीप भोई यांनी कार्य केले आहे व सहायक दिग्दर्शक म्हणून विभावरी मोरणकर,योगेश वाघ,मयुर जोशी यांनी काम केले आहे.बाल कलाकार म्हणून दर्शन देवरे,यश महाजन,
ललित पुराणिक,गौरव अहिरराव,रीना जाधव,आदित्य काटोल,अश्विन वाघ,राजश्री मनोहर यांनी काम केले आहे आणि अनिल मोरे,गीतांजली ठाकरे,पवन खांबायत,गणेश सोनार,सुषमा चौधरी,प्रशांत भामरे,ललित मोरे,योगेश सोनवणे, या कलाकारानी काम केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा