Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा आनंद वृद्धाश्रम, पालघर येथे वाढदिवस साजरा
संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा आनंद वृद्धाश्रम, पालघर येथे वाढदिवस साजरा
धुळे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मा.डी. टी. आंबेगावे सरांचा १० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वाढदिवस साजरा केला जातो. डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसाचे आयोजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि वृद्धाश्रमातील वृध्दांप्रती आपले प्रेम व्यक्त करता यावे या दृष्टीने सरांचा हा वाढदिवस पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर येथील आनंद वृद्धाश्रमातील सर्व वृद्धाना सकाळचा नाष्टा देण्यात आला. शिवाय तांदूळ व इतर साहित्यांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी पालघर जिल्हाध्यक्ष राजेश संखे, अमेय पिंपळे, संतोष कोरे, परेश संखे, जितेंद्र सावे, संजोग संखे, मुकेश सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोरे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचाली विषयी सर्वाना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पालघर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. शेवटी आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ.मनीषाताई कोटक यांनी या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. गांधली येथील जयश्र...
-
अमळनेर :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा