Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

गौण खनिज उत्खनन खदाणीचे E T S मोजणीचे आदेश, बेसुमार उत्खनन करणाऱ्या भामट्याचे धाबे दणाणले !



तरुण गर्जना वृत्तसेवा

शिंदखेडा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून संपूर्ण जमिन व जंगल नष्ट होण्याच्या मागावर आहे.दररोज मोठ मोठ् वाहनातून मुरुम वाळू,दगडाची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते.

विशेष म्हणजे सूर्यास्त नंतरही अवैध गौण खनिज वाहतूक या परिसरातून लाखो ग्रास गौण खनिज उत्खनन केले जात आहे. त्याची क्रेसींग करुन अवैधरित्या वाहतूक केली जात होती.असा बेकायदा उपसा होत असल्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे.

मात्र आमच्या तरुण गर्जना या वृत्तपत्रामार्फत सतत सुरू असलेला पाठपुरावा पत्रव्यवहार या मुळे झोपलेले प्रशासन अधिकारी जागे झालेत.व यामुळे प्रशासनाने गौण खनिज उत्खनन करणान्या
वाहनांवर कठोर कारवाई करीत वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.विशेष म्हणजे अनेक वाहनातून दिवसा व रात्री खडी वाहतूक केली जात होती.अश्या या दगड खडी व बाळू माफियांची तालुक्यात मोठी साखळी निर्माण झाली आहे.

प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध गौण खनिज उत्खननाचा धंदा सुरू आहे. या प्रकारामुळे शिंदखेडा तालुक्यातील गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मागावर आहे. प्रशासनाचे सर्व नियम व कायदे मोडले जात होते. मात्र अवैधरित्या वाहतूक करणान्या वाहनांवर कारवाई करून शिंदखेडा तालुक्यातील महसुल अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम करण्याची सुरुवात केलेली आहे.यात कुठलाही खंड न पडता एकामागे एक कठोर कारवाई अवैध गौण खनिज उत्खनन,वाहतूक यांना कायमचा चाप बसावा अशी कारवाई होणे सर्वसामान्य जनतेला अपेक्षीत आहे.

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी दगडाची चोरटी वाहतूक केली जात आहे. गौण खनिज उत्खनन करणारी शिंदखेडा तालुक्यात दररोज ३० ते ४० हायवा वाहने आहेत.या वाहनावर व ट्रॉलीवर नंबर दिसून येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी देखील निसर्ग प्रेमी मागणी करीत आहेत. 

याचाच एक परिणाम म्हणून मा.उपायुक्त नाशिक (महसुल विभाग) व जिल्हाधिकारी सोा.धुळे यांनी केलेल्या दगड खदाणींचे मोजणी करण्याचे आदेश जारी केले आहे व त्याच अनुषंगाने संबंधीत तहसिलदार यांनी खदाण धारकांना आपल्या खदाणींचे इ.टी.एस.मोजणी करण्याचे आदेश खदाण धारकांना दिले आहेत. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ अन्वये दिलेल्या परवाना पेक्षा जादा उत्खनन करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई होणे अपेक्षीत आहे.

( सविस्तर वाचा पुढीत अंकात)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध