Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगर परिषद नियोजित कार्यक्रम आचार संहिता लागू झाल्यामुळे रद्द.. झाल्या बाबत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले
शिरपूर वरवाडे नगर परिषद नियोजित कार्यक्रम आचार संहिता लागू झाल्यामुळे रद्द.. झाल्या बाबत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले
शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद नियोजित कार्यक्रम आचार संहिता लागू झाल्यामुळे रद्द झाल्या बाबत मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शिरपूर शहरात काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शिरपूर शहरातील स. नं. 60 या जागेवर 688 घरकुल कामांचा शुभारंभ बुधवार दि.10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता मुकेशभाई पटेल रिक्रिएशन गार्डन च्या मागे शिरपूर येथे संपन्न होणार होता.
परंतु,धुळे नंदुरबार विधान परिषदेची आमदारकीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे शासनाने आचारसहिता जाहीर केली आहे. यामुळे शिरपूर वरवाडे नगर परिषदेने आयोजित केलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा