Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

चाळीसगाव च्या त्या लाचखोर पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई आमदार मंगेश चव्हाण यांचा मागणीला अखेर हिरवा कंदील



चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण यांनी औट्रम घाटात पोलिसांकडून अवैधरीत्या होणाऱ्या वसुलीचा स्टींगद्वारे पर्दाफाश केल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. अवैधरीत्या वसुली करणाऱ्या पोलिसांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच चौकशी अंती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील चौघा पोलिसांचे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या लाचखोरावर कारवाई
हवालदार गणेश वसंत पाटील हवालदार प्रकाश भगवान ठाकूर कॉन्स्टेबल सतीश नरसिंग राजपूत कॉन्स्टेबल संदीप भरत पाटील अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत निलंबन काळात कोणतेही खाजगी नोकरी व्यवसाय करू नये असे आदेशात नमूद असून तसे आढळल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल तसेच गैरवर्तणूक मुळे अनुशेज्ञ असलेला भत्ता कर्मचारी कमावतील असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध