Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय !!



•आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ.

•११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ

•आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार.

•एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार.

•एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १० तारखेच्या आत होणार.

•सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार.

•महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार.

•विलनीकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालावर केला जाणार. सध्या राज्य सरकार विलीनीकरण करणार नाही.

•उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन.एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं सरकार ठाकरे सरकार !!

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध