Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
जिल्हा कोळी महासंघ व अरुण लोणारी मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त २०० कुटुंबांना फराळाचे वाटप..
जिल्हा कोळी महासंघ व अरुण लोणारी मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी निमित्त २०० कुटुंबांना फराळाचे वाटप..
सोलापूर प्रतिनिधी :सोलापूर जिल्हा कोळी महासंघ व अरुण लोणारी(कोळी)बंधू मित्रपरिवाराच्या वतीने दिपावली निमित्त २०० गोरगरीब गरजू महिलांना फराळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे म्हणून अध्यक्ष सोलापूर जिल्हा माजी सरकारी वकील ॲड.
संतोषजी न्हावकर उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहराध्यक्ष नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर,भाजपाचे सरचिटणीस शशिकांत थोरात उपस्थित होते.
मातोश्री लक्ष्मीबाई लोणारी यांच्या इच्छेनुसार गोरगरीब लोकांना फराळाचे वाटप करून सामाजिक ऋण असून ते मनापासून पूर्ण करण्याचे काम अरूण कोळी करत आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार असे विचार न्हावकर साहेबांनी मांडले.नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर य मनोगत व्यक्त म्हणाले की, अरूण लोणारी हे सात वर्षे पासून दिवाळी निमित्त गोर गरीब, वंचित कुटुंबांना फराळाचे साहित्य भेट देवून त्यांच्या सोबत दिवाळी सण साजरा करतात त्यांच्या या कार्याला मना पासून सलाम करतो व आपल्या कार्याचा विस्तार वाढावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अक्कलकोट येथे सेवा बजावणारे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक शामराव अंधटराव हे सेवानिवृत्त झालेल्या बद्दल त्यांचा कोळी समाजाच्या वतीने स्वपत्निक सत्कार करण्यात आला.
तसेच कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष राम कोळी व युवा नेते प्रसाद पाणीगार यांचा वाढदिवसानिमित्त कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अनिल बेळ्ळे,मुरलीधर कडलासकर सर,अन्नु जमादार,अशोक भोपळे, निंगप्पा कोळी, विश्वनाथ प्याटी ,बसवराज कोळी,अजय माने,मयूर गवते, सिध्दाराम कोळी,आकाश घंटे, दशरथ पाथरूट,रवींद्र कोळी, गुंडप्पा कोळी,पिंटू कोनापुरे,उज्वल दिक्षित, खलील शेख आदींची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा