Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने हि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ. काशिराम पावरा यांचा प्रमुख उपस्थित तहसिलदार यांना शिरपूर भाजपाचे निवेदन
केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने हि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ. काशिराम पावरा यांचा प्रमुख उपस्थित तहसिलदार यांना शिरपूर भाजपाचे निवेदन
शिरपूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल, डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून पेट्रोल डिझेलचे भाव कमी करुन जनतेला दिलासा दिला पाहिजे यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ. काशिराम पावरा यांचा नेतृत्वाखाली तहसिलदार आबा महाजन यांना (दि.१२ नोव्हेंबर) रोजी शिरपूर भारतीय जनता पार्टीने मागणीचे निवेदन दिले आहे.
तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील,ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील,मा.जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,तालुका चिटणीस सुनिल चौधरी,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, नगर सेवक देवेंद्र राजपुत, माजी नगर सेवक बापु थोरात, युवा मोर्चा विक्की चौधरी,राधेश्याम भोई, अविनाश शिंपी,राधेश्याम चौधरी,विजय सुर्यवंशी,हेमंत बोरसे,राजेंद्र गुजर,गणेश माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ.काशिराम पावरा यांनी तहसिलदार यांचाशी याविषयी सविस्तर चर्चा केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा