Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
श्री हेमंत मिना, श्री कविटकर व वनक्षेत्रपाल यांनी संघटितपणे १८ कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने खर्ची घातलेला आहे म्हणून चौकशी ACB, Charity commissioner, Police व मंत्रालय स्तरावर सुरू आहे.
श्री हेमंत मिना, श्री कविटकर व वनक्षेत्रपाल यांनी संघटितपणे १८ कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने खर्ची घातलेला आहे म्हणून चौकशी ACB, Charity commissioner, Police व मंत्रालय स्तरावर सुरू आहे.
विभागीय वन अधिकारी योजना यांनी सखोल चौकशी करून वरील सर्व दोषींविरुध्द निलंबन व बडतर्फीची कारवाईसह फौजदारी कारवाई करण्याबाबत अहवाल देऊनही मुवसं संजीव गौड यांच्या आशीर्वादाने प्रकरण प्रलंबित ठेवून घटनाबाह्य कृत्ये सतत केलेली आहेत ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. मंजुर कार्यआयोजनेत नमूद नसलेल्या बाबी करण्याचा हट्ट पुरविला नाही म्हणून हा खटाटोप सुरू आहे. असलेल्या वर्किग सर्कलमध्ये काम न करता सतत वनभंगाची दंडनीय कृत्ये करणार्यांचे विरोधात वनभंगाची दंडनीय कारवाई केलेली नाही. सतत स्थानिक पातळीवर वनमंत्री व पालकमंत्री तसेच आमदारांना हाताशी धरून केन्द्र सरकारची मंजुरी न घेता परस्पर वनेत्तर कामे करणार्या कोणत्याही अधिकार्यांचे समर्थन करणे म्हणजे वनांचे संवर्धन संरक्षण करण्याऐवजी स्वाहाकार करणे होय. त्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून २ लक्ष पेक्षा जास्त विचलन प्रस्ताव प्रलंबित ठेवून वनांची चाळणी करणार्यांना प्रोत्साहन देणे घटनाबाह्य कृत्ये ठरतात. मी कोणत्याही व्यक्तीच्या गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करीत नाही. प्रत्येक प्रकरणाची दुसरी बाजू ऐकुन न घेता परस्पर निर्णय देणे ही बाब नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत घातक व हुकुमशाहीला हाक देणारी आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा