Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी दीपक वाघ यांची नियुक्ती..!



धुळे प्रतिनिधी धुळे : लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी दीपक वाघ यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले यांनी हे नियुक्ती पत्र दिले असून उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यात करिता पत्रकार संघटना बळकट करण्याकरिता नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. लवकरच लोकशाही मराठी पत्रकार संघात उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार पदाधिकारी व सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करून संघटना बळकट करण्याचे आश्वासन देखील नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक वाघ  यांनी दिलं आहे.
 

या नियुक्तीबद्दल शिफारस लोकशाही मराठी पत्रकार संघांचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर तसेच औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रविण तायडे यांनी केली आहे.दीपक वाघ या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध