Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

साक्री नगर पंचायत निवडणुकीत पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादी चा रूपाने नाना नागरे कडे जाणार ?का या वेळी परिवर्तन होऊन भाजप चे कमळ फुलणार



साक्री शहरातील नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाचले आहे त्यातच काल निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता साक्री शहरातील नगरपंचायत निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. एकूण 17 जागांसाठी साक्री शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले साक्री शहरातील भाजपचे स्वतंत्र 17 उमेदवार उभे केले आहेत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची स्थानिक युती असल्याने त्यांची पकड मजबूत मानली जात आहे. मात्र महा विकास आघाडी मधून बाहेर पडून काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडली आहे.

त्यामुळे यावेळी निवडणुका त्रिशंकू होणार हे मात्र निश्चित आहे. साक्री शहराचे विकास पुरुष माजी नगराध्यक्ष नाना साहेब नागरे हे साक्री शहराच्या राजकारणात नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी राहिले आहेत. मात्र या वेळेस नाना नागरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांची ताकद अजून ही वाढले आहे. आणि सोबत राष्ट्रवादी सारख्या दिग्गज पक्षाची त्यांना साथ लाभली आहे. त्यामुळे साक्री नगरपंचायत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र साक्री ची जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेनेकडून मोठं नाव शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पंकज अहिरराव (मराठे) यांची व राष्ट्रवादी काँग्रेस मधून साक्री पंचायत समितीचे उपसभापती श्री नरेंद्र मराठे यांची देखील मोठे पाठबळ दिसते आहे. मात्र काँग्रेसने स्वबळावर लढण्याची जी काही घोषणा केली त्यात मात्र ते फारसे यशस्वी ठरताना दिसत नाहीत.कारण साठी शहरात कॉग्रेस चे कुठेही कार्यकरत्याची सांगड दिसत नाही आणि मतदारांना ही कॉगेस पक्ष बद्दल फारशी आत्मीयता राहिलेली नाही साक्री शहरातील शाहू,आदिवासी, दलित,मुस्लिम मारवाडी, वाणी,व इतर बाराबलुतेदार समाज हा पूर्वी पासूनच नाना नाना नागरे सोबत असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे त्यांना फारसे जड जाणार नाही असे वाटते आहे.

मात्र साक्री नगरपंचायत केलेल्या विकास कामांच्या जोरावर नागरे परिवारांचा विजयरथ रोखण्यास भाजप यशस्वी ठरणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपसाठी मागील पार्श्वभूमी पाहता मात्र या वेळी भाजप चा  परिस्थिती बऱ्यापैकी मजबूत असल्या चेही बोलले जात आहे.व 17 चा 17  जागा भाजप स्वबळावर लढवत आहे ही देखील साक्री शहरातील भाजप पदअधिकार्‍यांसाठी मोठी बाब आहे. 

परंतु साक्री शहरातील राजकारणाची जी सांगड नाना नागरे यांना घालता येते. व त्यांच्या याजकीय प्रदीर्घ अनुभव व हित संबंध याची अनुभूती त्याच्यातून दिसून येते. मात्र त्या तुलनेत एवढी  राजकीय खेळी किंवा मूठ बांधण्यातचे काम भाजप साक्री शहर व त्याचे नेते पदाधिकारी याना जमेल असे वाटत नाही.परंतु यावेळी तिरंगी लढत असल्याने नेमके काय होणार साक्री नगरपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकणार? की परीवर्तन होऊन भाजपच्या रूपाने कमळ फुलणार हे येणारा काळच ठरवेल.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध