Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

महाराष्ट्रत पेपर फुटी प्रकरणात कारवाई महाराष्ट्र परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याना अटक विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन पास केल्या प्रकरणी ठपका



टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. त्यानंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रीतीश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रे सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेतही घोटाळा झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तुकाराम सुपे यांची कालपासून चौकशी केली आणि त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह

चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध