Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
देशाच्या समृद्धतेत बँकांची मोठी भूमिका आता बँक बुडाली तरी, ठेवीदारांना दिलासा -केंद्रीय मंत्री रुपाला-
देशाच्या समृद्धतेत बँकांची मोठी भूमिका आता बँक बुडाली तरी, ठेवीदारांना दिलासा -केंद्रीय मंत्री रुपाला-
ठाणे- देशातील सर्व लोकांना पंतप्रधानांनी बँकेशी जोडले.बँकेचा विश्वास दिला त्याच धर्तीवर आता देशातील कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाली तर बँक खातेदारांना ठेवीदार प्रथम या कायद्यामुळे पैशाची हमी मिळणार असून,नव्वद दिवसांत पाच लाखापर्यंतची रक्कम देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. या कायद्याचा मोठा दिलासा राज्यासह देशभरातील बँक खातेदारांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्स्य व्यवसाय तथा दुग्ध व्यवसाय मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले.
वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले तसेच ते पुढे म्हणाले की एकेकाळी बँक ही केवळ व्यावसायिक ,उद्योजकआणि उच्च मध्यमवर्गीयांच्या ठेवी ठेवण्यासाठी ओळखली जात होती.पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या जनधन योजनेमुळे बँक आता सर्वसामान्यांची झाली.परेश शहा विनोदिनी समेळ यांना धनादेशाचे वाटप केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीतून मार्गदर्शन केले.
आम्ही समस्या सोडवायला आलोय,वर्षानुवर्षे असलेल्या अडचणीच्या समाधानाचा आजचा दिवस असून,तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यांचा बँकेत अडकलेलं पैसा मिळणार आहे.आता पर्यन्त या योजनेअंतर्गत अठठ्यान्नव टक्के लोकांना पैसे देण्यात आले उरलेल्या लोकांना देण्याची प्रकिया सुरू आहे.देशातील सामान्य माणसाची आम्हाला चिंता आहे त्याच सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून हा कायदा आम्ही अभ्यास करून संसदेत पारित केला असल्याचे सांगितले तसेच आजचा नवा भारत समस्या टाळत नाहीतर समस्या सोडवण्यावर भर देतो.आता कोणतीही बँक अडचणीत आली तर ठेवीदारांना पाच लाख रुपये नक्कीच मिळतील.या कायद्यामुळे ठेविदारांचे सुमारे श्यात्तर लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत ,आजचा दिवस कोटी कोटी ठेवीदारांना नवा विश्वास देईल देशाच्या समृद्धतेत बँकांची मोठी भूमिका आहे पण त्या बँकेचा ठेवीदार हा सर्वसामान्य माणूस असून त्याच्या पैशांना सुरक्षितता मिळण्यासाठी व त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळण्यासाठी हा कायदा मंजूर केल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
यावेळी या कायद्यातील लाभार्थी ठेवीदार यांनी या पाच लाखाच्या कव्हरमुळे आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक जयानंद भारती उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा