Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

तमाम शिरपूर तालुक्यातील जनतेला जाहीर आवाहन..!



मिशन वात्सल्या अंतर्गत कुरखळी ता शिरपूर येथे उद्या दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कोविड 19 (कोरोना) मुळे अनाथ झालेल्या पात्र बालक व विधवा महिलांना विविध योजनेंतर्गत लाभ देण्याकरिता एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. 
                  
कोरोनामुळे दगावलेल्या पालकांच्या वारसांना यात पात्र बालक व विधवांना विविध योजनांचा लाभ एका छताखाली  घेता यावा याकरिता मा.तहसिलदार शिरपूर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन वात्सल्य अंतर्गत तालुकास्तरिय समन्वय समिती कुरखळी येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे उद्या दि 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेला एक दिवसीय कार्यशाळा व विविध योजनांचे कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील कोविड 19 मुळे दोन्ही पालक दगावलेल्या व एकल / विधवा झालेल्या महिला यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

धन्यवाद 
योगेश्वर मोरे
प्रमुख - कुरखळी ग्रामसर्वांगीन विकास मंच,
सदस्य - नेचर कंझर्वेशन फोरम,शिरपूर
सदस्य - ग्राम रक्षक दल
सदस्य - आंतरराष्ट्रीय मराठा संघटन, महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध