Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या 12 गायीची नागरिकांनी केली सुटका..! हाडाखेड आरटीओ, सांगवी पोलीस हे नेमकं करतात काय ?




तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी 

शिरपूर : दि .२६ रोजी खंबाळे येथे अवैध मार्गाने कत्तलीसाठी जाणाऱ्या एक आयशर गाडीला नागरीकांनी थांबवून १२ गायींची सुखरुप सुटका केली.त्यानंतर सदर गायी व गाडी सांगवी पोलीसांत जमा करुन गायी गोशाळेत पाठविण्यात आल्यात.खरे पाहता राजस्थान,मध्य प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या उद्देशाने गुरे,ढोरे व गायी आणले जातात.या रस्त्याला सर्व प्रथम सांगवी पोलीस स्टेशन महामार्गाला लागूनच आहे. 


त्यांची महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर करडी नजर असते.अत्यंत दक्षपणे प्रत्येक गाडी थांबविली जाते. तपासली जाते आणि मग सोडली जाते. या नंतर पुढे हाडाखेड येथे आरटीओ चेकपोस्ट आहे.या चेकपोस्टवर गाडीची सर्व कागदपत्र ,गाडीत असलेला माल वजन गाडीची उंची या सर्व गोष्टी तपासल्या जातात.मग असे असतांना या ठिकाणाहून अवैध गुरे ढोर व गायींची वाहतूक करणारे वाहन कसे पास होतात ? या प्रश्नाची उत्तर सर्वसामान्य जनतेला माहित आहे. 


खरे पाहता या ठिकाणाहून कोणतीही अवैध वाहतूक करणारे वाहन तेथून पुढे जावूच शकत नाही.वाहन तपासणीचे सर्व अधिकार असलेले आरटीओ पथक रात्रंदिवस तेथे बसलेले असतात.मग हे तेथे बसून नेमके करतात काय ? तर दे दो हमको चंदा..!;चलने दो आपका गोरख धंदा ! असाच यांचा प्रकार आहे.प्रत्येक वेळेला अवैधमार्गाने वाहतूक होणाऱ्या गुरे, ढोरे व गायींची वाहतूक करणारे वाहने हे नागरिकच कसे काय पकडतात याचे कोडे पोलीसांना पडलेले आहे. 

अत्यंत बारकाईने तपासणी करून देखील पोलीसांच्या हातून व आरटीओच्या हातून ही वाहने सुटतात तरी कशी व नेमके नागरिक त्यांना पकडतात कसे.मग असेही वाटू लागते की,हा सर्व खेळ पडद्या मागील तर नाही ना ? असे इतर नागरिकांना वाटू लागले आहे.चिरीमीरी घेवून पोलीस व आरटीओ या गाड्या सोडतात व आपल्याच हस्तकाला सांगून त्या पुढे अडवल्या जातात आणि पुन्हा पोलीस स्टेशनला आणल्या जातात.हा झाला उत्पन्नाचा दुहेरी मार्ग ! आता नेमके हा मार्ग नेमका कुठे सुरु व कोठे बंद होतो याचा शोध आम्ही घेण्याचे ठरविले आहे. लवकरच याचा जनतेला लवकरच उलगडा होईल. 

( वाचा सविस्तर पुढील अंकात )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध