Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जानेवारी, २०२२

आश्वासक वाटचाल आजच्या दिवशीच 2 वर्षांपूर्वी मनसे च्या पहिल्या महाधिवेशनात अमित ठाकरे हे नाव



अधिकृतपणे पक्षाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले.अमित ला मी जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून त्याचा मला भावलेला सर्वात मोठा स्वभावगुण म्हणजे त्यात ठासून ठासून भरलेली विनम्रता. समोर कोणीही असो त्याच्या वागण्यात असलेली सभ्यता तो कधीच सोडत नाही. 

सध्याच्या युगात जिथे सरपंच असो वा नवखा कार्यकर्ता ते देखील वेगळ्या अविर्भावात असतांना अमित हा कायम जमिनीवरच पाय घट्ट रोवून असतो. नेतेपदी निवड होण्याआधी व नंतर सुद्धा अमित कायमच सामान्य कार्यकर्त्यप्रमाणेच वावरत आला आहे 

व हीच गोष्ट त्याला असामान्य बनवते. 
बाकी सगळीकडे काय परिस्थिती आहे ते आपण बघतो पण आमचा हा युवा खरंच त्याच्या वागण्याने आदर्श निर्माण करीत आहे.वेगवेगळे प्रश्न ते आशा सेविकांचे असो,डॉक्टर मित्रांचे असो, विद्यार्थ्यांचे असो,काहीही काम करताना कधीही ढळू न दिलेला संयम हा आपण पाहतच आलो आहोत.
अमित च्या राजकारणातील पदार्पणाची तारीख व बाळासाहेबांची जयंती हा "राजयोग" खुपच चांगले संकेत देतो.अमित चे भविष्य हे सर्वार्थाने उज्जवलच असेल हे नक्की.
अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या अमितला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व आशिर्वाद.

आपला नम्र
बाळा नांदगावकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध