Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

धुळे,साक्री तालुक्यातील जंगलातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निजामपूर,जैताने येथील शेतकऱ्याच्या 23 मेंढरू ठार मौजे आखाडे शिवारातील घटना



धुळे,साक्री तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निजामपूर,जैताने येथील शेतकऱ्याच्या 23 मेंढरू ठार मौजे आखाडे शिवारातील घटना श्री दगडू न्हानू ठाकरे गट नंबर यांच्या शेतात जैताने येथील मेंढपाळ नरेंद्र महादु ठाकरे व शरद प्रताप भलकारे यांचा वाडा होता सकाळी मेंढ्यांच्या कळपावर लांडग्याने हल्ला चढवून 23 मेंढ्याच्या पोटावर व मानेवर जबर जखमा केल्या या हल्ल्यात श्री शरद भलकारे यांचे 10 व नरेंद्र महादु ठाकरे यांच्या तेरा मेंढ्या मृत्युमुखी पडल्या या घटनेमुळे गरीब मेंढपाळाचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले सदर घटनेची माहिती जैताने येथील सरपंच सौ कविता अशोक मुजगे यांचे प्रतिनिधी माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक तात्या मुजगे व श्री गणेश न्याहाळदे सर ग्रामपंचायत सदस्य कळाली या बाबतीत साक्री वनविभागाचे प्रमुख यांच्याशी संपर्क करुन वनविभागाच्या कर्मचारी यांनी झालेल्या नुकसानीचा पंचानामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आव्हाड यांनी मेंढ्यांचे पोस्टमार्टम केले या पंधरा दिवसात परिसरात ही दुसरी घटना आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व मेंढपाळांच्या झालेल्या नुकसानीचा भरपाई लवकर मिळावी अशी मागणी जैताने गणातील पंचायत समिती सदस्या सौ सोनाली बाजीराव पगारे जैताने च्या सरपंच सौ कविता अशोक मुजगे व परिसरातील मेंढपाळ बांधवांनी केली आहे या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळ बांधव भयभीत झाले आहेत

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध