Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

बोरगाव येथील 80 वर्षाच्या वृद्धाला मिळाले 30 वर्षानंतर रेशन कार्ड



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव येथील श्री हिरालाल चिंधा पाटील यांच्या कडे जुनी 1995 ची शिधापत्रिका होती.शेतातील कामाच्या ओघात त्यांनी शिधापत्रिकेचे नूतनीकरण केलेच नाही.नंतर च्या काळात तहसिल कार्यालयात बऱ्याच हेरफाट्या घालून सुद्धा पदरी अपयश आले. 


गाव पुढाऱ्यांनी नवीन शिधपत्रिका आणून देतो म्हणून पैसे घेतले बदल्यात फक्त आश्वासने दिलीत. तहसिल कार्यालयातील एजंट मंडळींनी कधी 500 तर कधी 800 रुपये घेऊन फक्त तहसिल कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायला लावल्या. 

शेवटी गावातील उपसरपंच तथा शिरपूर तालुका सरपंच महासंघाचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी तहसिदार श्री आबा महाजन व पुरवठा निरीक्षक श्रीमती प्राजक्ता सोमलकर यांची भेट घेतली व *तब्बल 30 वर्षानंतर 80 वर्षाचे दाम्पत्य श्री हिरालाल चिंधा पाटील व सौ कलाबाई  हिरालाल पाटील यांना शिधापत्रिका मिळाली.

याकामी माजी मंत्री श्री अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक तथा माजी नगरसेवक श्री अशोकबापू कलाल, पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून श्रीमती दीपाली दाभाडे यांचे सहकार्य लाभले. 
वृद्ध दाम्पत्यांनी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध