Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

मुंबई येथील प्राणी कल्याण अधिकारी श्री आशीष बारीक यांच्यावर हल्ला करणाऱ्या कसांयानवर कठोरात कठोर कारवाई करावी



दोन दिवसांआधी मुंबई चुनाभट्टी पोलिस ठाणे अंतर्गत कसाई मोहल्ला येथे प्राणी कल्याण अधिकारी श्री आशिष बारीक यांना अवैध रित्या गोमास तस्करी करणारे वाहन  पोलिसांच्या मदतीने पकडले व पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना अचानक चाळीस-पन्नास कसाई एकत्र येऊन गोरक्षक आशिष बारीक व त्यांचे साथीदारांवर धारदार शस्त्र व हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले सोबत एका पोलिस कर्मचाऱ्याला ही मारहाण केली हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर गल्ला पोलिसांची संख्या कमी असल्याकारणाने जमावासमोर त्यांना माघार घ्यावी लागली

महाराष्ट्र शासनाने गाय गायीचे वासरू वळू किंवा बैल या प्राण्याचे रक्षणासाठी व उत्पादक महैशी तसेच रेडे यांच्या कत्तली किंवा कत्तली च्या उद्देशाने वाहतूक करण्यास शासनाने निर्बंध  घालण्यात आले आहे तरीदेखील कसाई लोक कायद्याच्या दाख न बाळगता गौ मांस व जनावरांची वाहतूक करीत व गौ रक्षकांन वरती प्राणघातक हल्ले करीत आहे.

तरी संबंधित हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या बाबत चे निवेदन आज राष्ट्रीय गोरक्षा वाहिनी व गौ सेवा संघ तर्फे शिरपूर तहसील कार्यालयात देण्यात आले
चेतन सिंग राजपूत जीतेन्द्र पाटील पवन मराठे गणेश बिरारी ईश्वर गवळी सूनील कोळी आधी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध