Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
गुटख्याची बातमी प्रसिद्ध केली म्हणून अमरावतीच्या पत्रकारांना आत टाकण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी
गुटख्याची बातमी प्रसिद्ध केली म्हणून अमरावतीच्या पत्रकारांना आत टाकण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी
मुंबई, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची गृहमंत्र्यांकडे मागणी अमरावती येथील ‘जनमाध्यम’ या दैनिकाने शहरातील गुटख्याच्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी, पत्रकारांना अशी उठाठेव न करण्याचा सल्ला देत पत्रकारांना आत टाकण्याची धमकी दिली आहे.पोलीस अधिकाऱ्यांचे हे वर्तन खाकी वर्दीचा दुरुपयोग करणारे आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व मराठी पत्रकार परिषद या कृतीचा तिव्र निषेध करीत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केली आहे.
एस. एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, एखाद्या गावात जुगार, गुटखा विक्री आदि गैरप्रकार चालत असतील तर ते उजेडात आणून त्या विरोधात प्रशासनास दखल घ्यायला भाग पाडणे हेच तर माध्यमाचे काम आहे. माध्यमं समाजस्वास्थ्यासाठी ही काम करीत असताना काही पोलीस अधिकाऱ्यांना मात्र पत्रकारांनी अशा ‘उठाठेव’ करू नयेत असे वाटत असते.मग यातून ते संबंधीत पत्रकारांना ‘आत टाकण्याच्या’ धमक्या देण्याच्या पातळीवर उतरतात.अमरावतीत सध्या हेच सुरू आहे. अमरावती येथून ‘जनमाध्यम’ नावाचे दैनिक प्रसिद्ध होते. या दैनिकात शहरातील गुटख्याच्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.या बातम्यांबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी त्यासंदर्भातला खुलासा संबंधित वृत्तपत्रांकडे पाठविणे अपेक्षित होते.
मात्र अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मीना यांनी असे केले नाही. त्यांनी व्हॉटसअॅपवरून संबंधित वार्ताहराशी संपर्क साधून आपल्या समोर हजर होण्याचे आदेश दिले.असे न केल्यास गुन्हा दाखल करून सहा महिने सडविण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी देखील संपादकांशी संपर्क करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
या घटनेचा राज्यातल्या पत्रसृष्टीत संताप व्यक्त होत असून राज्यातील सर्व पत्रकार ‘जनमाध्यम’ दैनिकासोबत आहेत.अशी ग्वाही देत संबंधित पत्रकारांना न्याय न मिळाल्यास पत्रसृष्टीला तीव्र आंदोलन करावे लागेल,असा निर्वाणीचा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...
-
अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा