अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको केला, त्यानंतर त्यांच्या फोटोवर काळे फासून, चप्पल-बुटांनी मारहाण करून अखेर पुतळा जाळत संताप व्यक्त केला.
प्रांताधिकारी कार्यालयावर दि. १५ रोजी महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. ओला दुष्काळ जाहीर करावा ह्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सरकारी कर्मचारी, आमदार आणि खासदारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी प्रथम महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको केला, त्यानंतर त्यांच्या फोटोवर काळे फासून, चप्पल-बुटांनी मारहाण करून अखेर पुतळा जाळत संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा अमळनेरात येऊन असे बोलून दाखवावे, असे आव्हान भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन यांनी दिले. तर उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी पदाधिकारी करीत होते. सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
या निषेध मोर्च्यात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये डॉ. अनिल शिंदे, माजी जि.प. सदस्य व्ही.आर. पाटील, माजी प.स. सभापती मीनाबाई पाटील, शाम अहिरे, प्रफुल्ल पाटील,राकेश पाटील,शितल देशमुख, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, माधुरी पाटील, देवा लांडगे, शिवाजी राजपूत, योगेश पाटील, दिनेश पाटील, कैलास भावसार, कमल कोचर, गौरव महाजन, राजेश पाटील, भूषण भदाणे, निलेश देशमुख, सुनील शिंपी भाजप सरचिटणीस भरतसिंग परदेशी, दिलीप ठाकूर, राम कालोशे, इम्रान खाटीक, शिवाजी दौलत पाटील, मुक्तार खाटीक, बाळू पाटील, अख्तर तेली, सुरेश पाटील यांसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, मोर्च्या वेळी काही काळ वाहतूक खोळंबली होती.घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा