Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री शहर नगर पंचायत चा निवडणुकीला गालबोट ! मतदार बूथ जवळ आणल्याचा राग येऊन भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण
साक्री शहर नगर पंचायत चा निवडणुकीला गालबोट ! मतदार बूथ जवळ आणल्याचा राग येऊन भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण
साक्री - मतदार मतदानासाठी आणल्याचा राग येऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्याला विरोधकांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेश आजगे असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस प्रशासनासमोर मारहाण होत असताना पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप शैलेश आजगे यांनी केला.
दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे जखमी असलेल्या आजगे यांनी पोलीस स्थानकात जात अरविंद भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे.
साक्री पोलिसांना वारंवार माझ्यावर हल्ला होणार असल्याची कल्पना देऊनदेखील पोलिसांनी या घटनकडे दुर्लक्ष केले असून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना निलंबित करण्याची मागणी आजगे यांनी केली आहे. या घटनेमुळे प्रभाग क्र. 14 मधील जिजामाता शाळेजवळ दोन्ही गटांची मोठ्या प्रमाणात गर्दी झल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस पोहचले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
आजगे यांनी पुन्हा मतदान केंद्रावर येऊन बूथवर थांबण्याचा आग्रह केल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व आजगे यांच्यामध्ये मतदान केंद्रावरच शाब्दिक चकमक देखील झाली. त्यामुळे पुन्हा काही काळाकरीता तणावाचे वातावरण झाले होते. मात्र, पोलिसांनी पुन्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, साक्रीच्या 4 उर्वरित जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. थोडे वादविवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
टारीं गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा