एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक झाली. यात आज जाहीर झालेल्या मतमोजणीत भाजपाने 11 जागा जिंकल्यात.तर शिवसेना 4,अपक्ष एक आणि काँग्रेसने एक जागा जिंकली.
साक्रीच्या इतिहासात पहील्यांदा भाजपला सत्ता मिळाली आहे.यामुळे गेल्या 40 वर्षा पासूनची साक्री च्या राजकारणात हुकूमत राखणाऱ्या ज्ञानेश्वर नागरे याना यावेळी मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे.याशिवाय इतर ही मातब्बराना धक्का बसला आहे.
धुळ्यात जल्लोष
साक्रीतील विजयानंतर धुळ्यात भाजपा तर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,हिरामण गवळी, सुरेश पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.माजी मंत्री आ.जयकुमार रावळ यांनीही या विजयाचे स्वागत केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा