Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

खर्दे विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी..!



तालुक्यातील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.प्रथमतः राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
     
प्रास्ताविकात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा परिचय  सिनेट सदस्य अमोल सोनवणे यांनी करून दिला.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी. आर.साळुंखे यांनी आजच्या काळात जिजामातेने शिवरायांना दिलेली शिकवण व संस्कार किती महत्त्वाचे आहेत तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार अंगिकारून आपले जीवन आदर्शवत कसे करता येईल हे पटवून दिले.
   
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे ,पी.बी.धायबर,ए.जे.पाटील,अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार, पी. एस. अटकाळे, बी.एस. पावरा, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम,
मनीषा पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा जाधव तर आभार ए जे पाटील यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध