Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

‘लिव्ह-इन’चे नाते तुटल्याचा संताप; प्रियकराकडून युवतीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल! शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये  असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पीडित युवतीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संशयित 

आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.अशी झाली ओळख:

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एका संस्थेत कार्यरत असलेल्या ग्रामीण भागातील युवतीची ओळख शहरातील खानावळ व्यवसायिक व्यंकटेश दीपक बारी या तरुणासोबत मेसच्या माध्यमातून झाली होती. ओळख वाढल्यानंतर तरुणाने युवतीला प्रेमाचा प्रस्ताव दिला. युवतीने तो स्वीकारल्यानंतर दोघे शहरातील एका खोलीत 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

दारूच्या व्यसनामुळे नाते तुटले:
साधारण दीड महिना सोबत राहिल्यानंतर युवतीच्या लक्षात आले की, व्यंकटेशला दारूचे व्यसन आहे. 

तिने त्याला व्यसन सोडण्याचा आग्रह केला, मात्र तो दररोज मद्यपान करून येत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. तरुणाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून अखेर युवतीने व्यंकटेशसोबतचे नाते तोडले आणि ती आपल्या गावी परतली.

रागातून आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल:

युवतीने नाते तोडल्यानंतर व्यंकटेशने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. याचा राग आल्याने तरुणाने युवतीला धमकी देण्यास सुरुवात केली की, "माझ्याकडे तुझे आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप आहेत, ते मी व्हायरल करेन." युवतीने सुरुवातीला या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र, याचा राग मनात ठेऊन संशयित आरोपी व्यंकटेश बारी याने युवतीचे आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल केले.

एवढ्यावरच न थांबता, १७ सप्टेंबर रोजी व्यंकटेशने युवतीची भेट घेऊन तिचा मोबाईल हिसकावला आणि तिच्या संस्थेच्या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे व्हिडिओ पाठवले.

युवतीची पोलिसांत धाव:

या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास झालेल्या युवतीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित व्यंकटेश दीपक बारी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हा नोंदवला असून, संशयित आरोपी व्यंकटेश बारी याचा शोध सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध