Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

काॅंग्रेसला मोठा धक्का..महापौरां सह सर्व २७ नगरसेवक राष्ट्रवादीत !



धुळे,मालेगाव शहरात काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख कुटुंबियांत गेले सहा महिने सुरु असलेले राजकीय नाट्य आज पूर्ण झाले. त्यांनी पत्नी व महापौर ताहेरा शेख यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
आज दुपारी याबाबत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही निर्णय झालेला नाही. हे फार काळ चालण्यासारखे नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध