Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

खर्दे विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा..!



आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे येथे 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण आर सी पटेल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 
    
विद्यालयाचे प्राचार्य पी आर साळुंखे यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचलन सीमा जाधव व ए जे पाटील यांनी केले.यावेळी सरपंच सविताबेन काशिनाथ पटेल, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, काशिनाथभाई पटेल, ग्रामपंचायत सदस्य शिरसाठ, आरोग्य सेविका श्रीमती चांदेकर,आशा सेविका सुनिता पाटील,उर्मिला चौधरी तसेच ग्रामसेवक बैसाने,श्वेता गुजर आदी उपस्थित होते.
    
कोरोना काळात ज्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांचा सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, युवराज मिठभाकरे,अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार, बी .एस. बडगुजर, पी. एस. अटकाळे, बी .एस. पावरा, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध