Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
आशाताई व गटप्रवर्तकांना कोविड लसीकरणाच्या कामाचा मोबदला लागू करून नोव्हेंबर २०२१ पासूनचे मानधन अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील
आशाताई व गटप्रवर्तकांना कोविड लसीकरणाच्या कामाचा मोबदला लागू करून नोव्हेंबर २०२१ पासूनचे मानधन अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील
राज्यात कोरोना संकटात जिवाची पर्वा न करता खंबीरपणे सामना करणाऱ्या तसेच अनेकांचा जिव वाचविणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाने नोव्हेंबर २०२१ पासून नियमित कामाचे मानधन अदा केलेले नाही. शासन आदेशानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दरमहा १ तारखेपर्यंत मानधन देणे बंधनकारक आहे.
असे असताना राज्यातील आशाताई आणि गटप्रवर्तकांना नोव्हेंबर २०२१ पासून मानधन मिळालेले नाही.परिणामी या गरीब कुटुंबातील आणि दारिद्रय रेषेखालील राज्यातील सुमारे ७२ हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.
आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक आपल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासह नियमित कामकाज सांभाळून कोविड लसीकरणाची पडताळणी करणे, लसीकरणासाठी नागरिकांना बोलवणे, जनजागृती करणे,लसीकरणा संबंधी माहिती अद्ययावत व संकलन करणे.वरीष्ठ पातळीवर वेळोवेळी माहिती पाठविणे अशा प्रकारची कामे आशा स्वयंसेविका रात्रंदिवस आजही करीत आहेत.असे असतांनाही सदर कामाचा स्वतंत्र मोबदला त्यांना दिला जात नाहीये. परिणामी आशाताईंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घेऊन नोव्हेंबर २०२१ पासूनचे थकीत मानधन अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी आणि यापुढे दरमहा १ तारखेला मानधन देण्यात यावे तसेच कोविड लसीकरणाच्या कामाचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांनाही मोबदला लागू करावा.
अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मा.राजेशजी टोपे,मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यासह मा.डॉ.प्रदिप व्यास,प्रधान सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग, मा.डॉ.रामास्वमी एन.,आयुक्त आरोग्य सेवा तसेच मा.सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मंत्रालय मुंबई यांना संघटनेने ई-मेल व्दारे पाठविले आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे थकित मानधन तात्काळ न मिळाल्यास कामबंद करतील असा इशाराही निवेदनाद्वारे संघटनेने दिलेला असल्याचेही रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा