Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

दातृत्व ! मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून डॉक्टरने शेतकरी कुटूंबाला बांधून दिलं घर



नांदेड प्रतिनिधी :आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न म्हणजे घराचं स्वप्न..
नांदेडच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी लक्ष्मी साखरे यांच घराचं स्वप्न पुण्याच्या एका डॉक्टरने पुर्ण केल आहे.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील राजेश साखरे या शेतकऱ्याने तीन वर्षांपूर्वी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती.

राजेशच्या आत्महत्येनं उघड्यावर पडलेल्या कुटूंबाला हक्काचे घर मिळाले आहे.पुण्यातील इएनटी सर्जन असलेल्या डॉ.मिलिंद भोई यांनी मुलगी गायत्रीच्या लग्नाचा अवास्तव खर्चाला फाटा देत आत्महत्या केलेल्या राजेशची पत्नी लक्ष्मीला अर्धापूर येथे घर बांधून दिलं आहे.घरांच काम अंतिम टप्प्यात असून,गायत्रीचं लग्न काल लग्न झालयं याच बरोबर डॉ.मिलिंद भोईनी केलाला घराचा संकल्प ही पुर्ण केला आहे.


सहाशे स्केअरफुट जागेवर बांधलेलं टूमदार घरांत लक्ष्मी साखरे आणि त्यांच्या मुली प्रवेश करणार आहेत. पतीच्या पश्चात दुखाःचा डोंगर असताना डॉ.भोईमुळे घराचं स्वप्न साकार झाल्यानं लक्ष्मी आणि मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळलेला असताना अनेकांना यातून सावरने कठीण होते मात्र,लक्ष्मीच्या घरांच स्वप्न साकार करणाऱ्या डॉ.मिलींद भोई सारख्या सामाजिक बांधिलकी,संवेदनशीलता इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध