Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
अवैध ऊत्खनन प्रकरणी जलचक्र येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाला ४ कोटी ८६ लक्ष रुपयांचा दंड…!
अवैध ऊत्खनन प्रकरणी जलचक्र येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाला ४ कोटी ८६ लक्ष रुपयांचा दंड…!
बोदवड प्रतिनिधी :- तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती.यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या.
तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती.
सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोदवड तहसीलदारांना आदेश दिले आहे.
4 कोटी 86 लाख 29 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तिन तहसिलदारांच्या बदल्यानंतर महसूल प्रशासनाकडून मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बोदवड तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी दिनांक 20/01/2022 रोजी आदेश काढले आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा