Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ जानेवारी, २०२२
पञकार यांच्यासाठी खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.
सावधान अधिकार्यांनो पञकार त्यांच्या कुटुंबाला मारहाण कराल तर होणार गुन्हे दाखल.दै.बुलंद शक्ती संपादक परिवाराला मारहाण करणे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे सह अन्य पोलिसांच्या अंगलट.गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने स्पष्ट दिले आदेश. संपादक रामेश्वर दरेकर सह अँड विकास भाले यांचे सर्व स्तरातून कौतुक केले सत्य परेशान होता है पराजित नहि हे अगदी बरोबर आहे.
यशाचं शिखर गाठण्यासाठी अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते,मोठं होण्यासाठी अधि मरावं लागतं अनाथांची माय स्वर्गिय सिंधुताई सपकाळ या बोलुन आपल्यातुन निघून गेल्या आहेत.जिवंत पणी त्यांना अनेक वेदनादायी समस्यांना तोंड द्यावे लागले. दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी आपल्या वर्तमानपत्रांतून जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अवैध धंद्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी कारवाई करणे अपेक्षित होते संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी अभय दिला होता.
यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय उरलेलाच नव्हता सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे शेवली पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या साथीदारांनी मिळुन चक्क दैनिक बुलंद शक्ती संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या भावाला शेतात जात असताना अडवून केवळ बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून अमानुष मारहाण केली होती यात रामेश्वर दरेकर यांचे बंधु परसराम दरेकर हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत संबंधीत जनरल डायर विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे भाऊ परसराम दरेकर यांना औरंगाबाद येथील जे.जे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मेंदुला दुखापत झाली होती अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते,
या घटनेचा परिणाम वडिलांच्या मनांवर गंभिर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील एम आयटी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते एकीकडे भावाच्या गर्भवती मुलीला हि बाब कळल्यावर तीला अचानक चक्कर आल्यानंतर तिला जालना येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ,
एकीकडे दहा महिन्यां पुर्वी कोरोनाचा हाहाकार सर्व रस्ते,शहर गाव ओसाड पडली होती,कुणी नातेवाईक मित्र कुणाच्या मदतीला धावून येत नव्हती , प्रत्येकाला आपल्या परिवारासह जिवाला वाचविण्यासाठी धडपड सुरू होती.
खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचा म्हटले तर आर्थिक भुर्दंड सहन न होणारा या समस्येला तोंड देत संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी राञदिवंस जागुन भाऊ परसराम दरेकर यांना वाचवलं यात सर्व पञकार बंधु संपादक,पञकार संघटना यांनी रामेश्वर दरेकर यांना त्यांच्या भावाला समक्ष भेटून वारंवार धिर दिला, परंतु वडिल शिवाजी दरेकर यांना वाचविण्यासाठी अपयश आलं.वडिलांच्या निधनानंतर रामेश्वर दरेकर यांनी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख जालना सह विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांच्या,ग्रहमंञी दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली तसेच महाराष्ट्रभरातून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला गेला,निवेदन गुन्हा दाखल करण्याबाबत देण्यात आली , राजकीय सामाजिक संघटना पञकार संघटना यांनी हा विषय लावून धरला विविध दैनिक,साप्ताहिक संपादक यांनी बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर निगरगट्ट पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांना गुन्हा दाखल करण्यासाठी थोडंसं गांभीर्य वाटलं नाही.
वडिलांच्या निधनानंतर रामेश्वर दरेकर यांच्या मनांवर विपरीत परिणाम झाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा बाणा असलेल्या संपादक रामेश्वर दरेकर यांनी खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका अँड विकास भाले यांच्या माध्यमातून दाखल केली.अँड विकास भाले यांनी रामेश्वर दरेकर यांच्या कडे उपलब्ध पुरावे विविध घडामोडींचा आढावा घेऊन सत्य परिस्थिती आधारित रिट याचिका तयार केली अँड विकास भाले यांनी कायदेशीर बाजु भक्कम पुराव्यानिशी भुमिका पार पाडत देशातील पञकार यांची मान उंचावेल असा निर्णय खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयाचे मा. संदिप कुमार सी.मोरे,व्हि.के.जाधव न्यायाधीश यांच्या समोर दरेकर परिवाराची सक्षम बाजु मांडल्यामुळे न्यायलयाने सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे समर्थन सर्व पञकार बंधु भगिनींने केलं आहे. अँड विकास भाले तसेच संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच सर्व स्तरातून या भुमिका मुळे स्वागत होत आहे. खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील पञकार यांना दिलासा मिळाला आहे आपल्या परिवारासह पञकार यांच्या वर हल्ले झाल्यानंतर हा निकाल कायदेशीर रित्या महत्वपूर्ण ठरणार असल्याचे अँड विकास भाले यांनी सांगितले आहे.
रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी हा निकाल म्हणजे माझे वडिल यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे असं मतं व्यक्त केले आहे.पोलिस अधीक्षक, तसेच पोलिस उप अधीक्षक,पोलिस निरीक्षक,इतर कर्मचारी यांनी मारहाण पञकार त्यांच्या कुटुंबीयांना केल्यास त्यांनाही ही आता कारागृहात जावं लागणार हे निश्चित आहे.म्हणून खबरदार देशाच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी कराल तर शेवटी न्यायालयात संविधानाच्या चौकटीत तुम्हाला शिक्षा निश्चित आहे.पोलिस अधीक्षक विनायक देशमुख न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करुन आपली कर्तव्य पार पाडतील की पहिले पाढे पंचावन्न करतील याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.
देशाचा चौथा स्तंभ असुरक्षित या निकालामुळे पञकार यांना दिलासा.
हल्ली देशात कुठेना कुठे पञकार यांना रोज बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर मारहाण धमकी,खुन राजरोसपणे केला जातो,पञकार जिवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी सुरक्षेसाठी दिवसरात्र रोखठोक बातम्या प्रसिद्ध करित असतो तो त्याचे कुटुंब असुरक्षित असते पोलिस यांच्या अवैध धंदे बाबतीत बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर याचा राग मनात धरून पञकार यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या वतिने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकवतातक्षयामुळे पञकार यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो पञकार यांचे खच्चीकरण केले जात.माञ औरंगाबाद खंडपीठाने दिलेला हा निकाल अधिकारी यांना चपराक देणारा आहे. देशाच्या चौथ्या स्तंभाला बळ देणारा आहे.पञकार यांची लेखणी लोकशाही मार्गाने नव सनजीवणी देण्याचे काम अविरतपणे चालू ठेवण्यास देण्याचे काम शासनाने करावे अशे आदेश कोर्टाने दिले आहेत
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा