Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

महामार्गावरील आमोदे शिवारात गांजा तस्करी करणारे दोघे शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात



शिरपूर प्रतिनिधी : महामार्गावरील आमोदे शिवारात असलेल्या उड्डाण पूलाखाली दोघे जण गांजा विक्री करीत असल्याची खबर मिळाल्याने शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गांजा बाळगणारे दोघे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांनी ज्यांच्याकडून हा गांजा घेतला त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर फाट्यावरील आमोदे शिवारात उड्डाण पूलाखाली दोघे जण गांजा विकत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी काल रात्री ८.३० च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुमारे २५ किलो गांजासह दोघे जण पोलिसांच्या हाती लागले. किसन विजय मारीमुत्तु ( २२ ) व गौरव ऊर्फ गोलु दिनेश कजानिया (१९) दोघे रा.उल्हासनगर,जि.ठाणे असे त्यांचे नाव असूनत्यांनी हा गांजा शिरपूर तालुक्यातील आपसिंग पाडा येथील मिथुन पावराकडून घेतल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी या दोघांजवळील २४ किलो ६९० ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख २२ हाजर ४५० रुपये किंमीचा गांजा जप्त केला असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरिखक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध