Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

कळंबू ,ब्राम्हणे रेल्वे पुलाजवळ पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच्या सहाय्याने


अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे
येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच्या सहाय्याने डंपर भरले जात आहेत.

पांझरा नदीतून मांडळ व कळंबू येथून रात्री वाळू सुसाट सुरु झाल्याने अवैध वाळू वाहतुकीला पुन्हा ग्रीन सिग्नल मिळाल्याचे चित्र आहे. कळंबू गावाजवळील रेल्वेपुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाळूचा ठिय्या करण्यात आला आहे.

तालुक्यात डंपरने सकाळी मुरुम व रात्री वाळू वाहतूक सुरु असून वाळू वाहतुकीला मागील पॅकेजमध्येच दहा दिवसांची सूट दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा वाळू सुसाट सुटली आहे. त्यामुळे या वाळू माफियांवर कोणाचा आशिर्वाद आहे ? हे संपूर्ण तालुक्याला कळून चुकले असून तालुका प्रशासन कशाच्या ओझ्याखाली दबले आहे हे ही सर्वज्ञात झाले आहे.

रेल्वे भोगद्यातुन डपंपर ने वाहतूक करत असतात डंपर मधुन खाली पडलेली वाळूमुळे मोटारसायक घसरून आपघात होत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध