Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ कोरोनाच्या भीतीने रुग्णांचा घरीच उपचार



जिल्ह्यात वातावरण समिश्र असल्याने काही
 दिवस सकाळी थंड आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यातच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे आणि त्याबाबत सोशल मिडीयावर वाढत्या प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. यामुळे घरीच उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून केले जात आहे. 
गेली महिनाभरात राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. हिवाळ्याच्या अंतिम टप्पा आणि उन्हाळ्याचा प्रारंभ यातच पाऊस पडल्याने वातावरणात बदल निर्माण झाला. सकाळी थंडी तर दुपारी उष्मा असे वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे ताप, थंडी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचा त्रास अनेकांना होवू लागला आहे. यामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरण बदलामुळे नागरिकांनी आहार कसा घेतला पाहिजे याबाबत जागृती केली जात आहे. तर दुसरीकडे जगभरात कोरोना चा फैलाव पुन्हा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
नियमित खोकला असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या हा उत्तम उपाय असल्याचे देखील आयुर्वेद सांगते. यामुळे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, स्वच्छता, गरम पाणी पिणे हे पारंपारिक उपाय करणे देखील फायदेशीर ठरत आहेत. गेली कांही दिवस बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकला आणि जुलाबाचे प्रमाण वाढल्याने दवाखान्यात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे शिवाय घाबरून जाण्याऐवजी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असा सल्ला डॉक्टर देत आहेत. वातवरण बदलामुळे घराघरात सर्दी तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोना सक्रीय झाल्याने दवाखान्यात जाऊन उपचार करण्यापेक्षा घरातच उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे.
सद्या बदलत्या तापमानामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्दी ताप खोकला अशा आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. नागरिकांनी कोरोनासारख्या आजाराबाबत काळजी घेवून घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली पाहिजे 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध