Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

सरस्वती विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील लसीकरण संपन्न...!



श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयात पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न झाले. करोणा महामारी चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर चे अध्यक्ष डॉक्टर ध्रुवराज वाघ यांच्या मार्गदर्शनाने डॉ. महेंद्र साळुंखे डॉ. विद्या महाले श्रीमती रेणुका हरणे श्री मयूर भिलाने यांच्या पथकाने लसीकरण केले. 

डॉक्टर योगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ११ जानेवारी हा सहकार भारती संघटनेचा स्थापना दिवस.सहकार भारती संघटनेच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने लसीकरण होत असलेल्या विद्यार्थ्यांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचे लसीकरण व्यवस्थे साठी सहकार भारती चे उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख श्री दिलीप लोहार प्रकोष्ट प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री प्रकाश सिंग सिसोदिया फळबाग  प्रक्रिया प्रकोष्ठ प्रमुख श्री दिलीप चौधरी जिल्हा संघटन प्रमुख शशी चौधरी शाळेचे व्यवस्थापक श्री शशिकांत जोशी श्री साहेबराव मिस्तरी व सहकार भारती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध