Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
महाड मधील खाजगी रासायनिक कंपनीला विकलेले हेलीपॅड ना.शरद पवारांच्या स्वागतासाठी पुन्हा खुले औद्योगिक विकास महामंडळाचा आंधळा कारभार
महाड मधील खाजगी रासायनिक कंपनीला विकलेले हेलीपॅड ना.शरद पवारांच्या स्वागतासाठी पुन्हा खुले औद्योगिक विकास महामंडळाचा आंधळा कारभार
महाड औद्योगिक क्षेत्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले हेलीपॅड एका खाजगी रासायनिक कंपनीला देण्यात आलेल्या जमिनीमध्ये विकण्यात आले आहे. यामुळे गेली कांही महिन्यापासून या हेलीपॅडचा ताबा कंपनीकडे होता. मात्र एका कंपनीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ना. शरद पवार हे महाड औद्योगिक क्षेत्रात येणार असल्याने हे हेलीपॅड पुन्हा खुले करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र उभे राहणार होते. याठिकाणी भूमिगत विद्युत व्यवस्था, पदपथ, हेलिपॅड, दूरध्वनी, पाणीपुरवठा योजना, पोलीस चौकी, आदी कामांचा आणि सुविधांचा यामध्ये समावेश होता. या क्षेत्राकरिता सन १९९९ पर्यंत जवळपास १३३२.४६ लक्ष खर्च करण्यात आला. हे हेलिपॅड गेली अनेक वर्ष वापरात आले. मात्र पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात शासनाने स्वारस्य न दाखवल्याने हे क्षेत्र ओसाडच राहिले आहे. यामुळे पंचतारांकितचा दर्जा शासनाने काढून टाकल. यामुळे कांही महिन्यापूर्वी हे हेलिपॅड देखील या परिसरात येणाऱ्या ओरिएन्ट अॅरोमॅटीक अॅन्ड सन्स लिमिटेड कंपनीला विकण्यात आले आहे. याठिकाणी कंपनीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे कंपनी प्रशासनाने हेलिपॅड च्या जागी कंटेनर टाकून तात्पुरत्या स्वरूपातील कार्यालय उभे केले होते. आज दिनांक ८ जानेवारी रोजी येथे नव्याने उभी राहत असलेल्या अॅस्ट्ाईड लाइफ सायन्सेस या कंपनीच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष ना. शरद पवार येणार असल्याने हे हेलिपॅड पुन्हा सुरु केले आहे. येथील कंटेनर हटवण्यात आले आणि पूर्वीचे हेलिपॅड पुन्हा खुले करून एकाच दिवसाकरिता हेलिपॅड वर हेलिकॉप्टर उतरवण्यात येणार आहे.
याबाबत महाड औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालयाचे माधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जी जागा ओरिएन्ट अॅरोमॅटीक अॅन्ड सन्स लिमिटेड कंपनीला दिली आहे त्या जागेतच हे हेलिपॅड अस्तित्वात होते. यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने हे हेलिपॅड या जागेसह वाटप केले आहे. यामुळे आता हेलिकॉप्टर उतरवण्यास देण्याचा अधिकार हा त्या कंपनीचा असल्याने त्यांच्याकडूनच आता परवानगी दिली असावी असे सांगण्यात आले आहे.
ना.शरद पवार हे देशपातळीवरील नेतृत्व आहे. राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाची काळजी स्थानिक प्रशासनाला घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी हेलिपॅड आहे त्याठिकाणी कंपनीचे काम सुरु असून खाजगी कार्यालयाचे कंटेनर देखील तिथेच ठेवले आहे. यामुळे स्थानिक महसूल प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ, आणि पोलीस प्रशासन याठिकाणी कायम लक्ष देवून आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
कोपरगाव प्रतिनिधी:- मा.राजेश देशमुख साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा