Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
रुग्ण वाढत असले तरी लॉकडाऊन, जिल्हाबंदी नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली ‘ही’ घोषणा
रुग्ण वाढत असले तरी लॉकडाऊन, जिल्हाबंदी नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली ‘ही’ घोषणा
मुंबई प्रतिनिधि :7 जानेवारी 2021 सध्या कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे.देशातील जी रुग्णसंख्या आहेत तिच्या २५ टक्के पेक्षा जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.कालच्या आकडेवारीनुसार देशात एक लाख सात हजार रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३६ हजार महाराष्ट्रामधील होते.
त्यामुळे अनेकांच्या मनात लॉकडाऊन, जिल्हाबंदी होईल का ? लोकल बंद होतील का ? अशा चर्चा होत्या.परंतु आता या सर्व शक्यतांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फुल स्टॉप दिला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईतील लोकल ट्रेन बंद करण्याचा किंवा जिल्हाअंतर्गत बंदीचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे त्यांनी लॉकडाऊनची शक्यता देखील फेटाळून लावली. परंतु त्यांनी संगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्तरावरील विचारविनिमयानंतर कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार आहे.
रात्रीची संचारबंदी व वीक एंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की,या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली,पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील.
त्याच प्रमाणे त्यांनी अशी माहिती दिली की, रुग्ण संख्येत वाढ होत असली तरीही रुग्णालयातील बेड मोठ्या संख्येने रिक्त आहेत.ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही.आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही.
त्यामुळे या सर्व गोष्टी जमेच्या बाजू आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये सध्या फुप्फुसापर्यंत हा संसर्ग पोहोचत नाही.
केवळ घशापर्यंत संसर्ग मर्यादित आहे. घसा,नाकापर्यंत लक्षणे आढळतात.घशात खवखव,सर्दी होणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे टोपे म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीदरम्यान त्यांनी सुसाट वाढत चाललेली रूग्णसंख्या, लसीकरण तसेच विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, बुधवारी कोरोनाच्या २५ हजार केसेस सापडल्या.उद्या कदाचित ३५ हजार केस असू शकतील.
त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. सध्या घातलेल्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा.
अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यासाठी काही अधिक निर्बंध वाढवायची गरज भासली तर तेही घालावेत,अशा प्रकारची चर्चा करून शरद पवार यांनी आढावा घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शहरातील मुख्य व्यापारी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएमची यंत्रणा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड...
-
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुमारास नरडाणा पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत ८८,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा