Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ जानेवारी, २०२२
खान्देशा सह धुळे,नंदुरबार गारठले..विक्रमी निच्चांकी तापमानाची नोंद
धुळे : उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून थंडीची लाट आहे. प्रचंड गारठा वाढला असून धुळ्याच्या तापमानात विक्रमी घट झाली आहे. गेल्या काही वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. आज धुळ्यात २.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची रेकॉर्ड ब्रेक नोंद करण्यात आली
गेल्या तीन दिवसांपासून धुळ्याच्या (Dhule) तापमानामध्ये विक्रमी घट झाल्याचे बघायला मिळाले आहे. पाकिस्तानात (Pakistan) आलेल्या धुळीच्या वादळानंतर हवामान विभागातर्फे तापमानामध्ये घट होऊन थंडीची लाट पसरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार हळूहळू तापमानामध्ये घट होऊन आज २.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हाडे गोठवणार्या थंडीमुळे धुळेकर चांगलेच गारठले आहेत. उधार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेताना धुळेकर बघावयास मिळत आहे.अबाल वृद्ध ना मात्र या तुफान थंडीचा चांगलाच त्रास जाणवत आहे या कडाक्याच्या थंडीत अनेक मृत्यू देखील झालेले आहेत
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा