Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ जानेवारी, २०२२

नाशिक : उत्तर महाराष्ट्र मध्ये शिक्षण क्षेत्रात बोगस प्रमाणपत्रधारकांचे धाबे दणाणले आहे



धुळे : ‘टीईटी’ मधील गैरव्यवहाराने राज्यातील शिक्षण विभागाला हादरून टाकले आहे. या गैरव्यवहारातील बोगस शिक्षकांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राची (Certificate of passing TET) पडताळणी करायला सुरवात झाली आहे. पैसे भरून बोगस प्रमाणपत्र (Bogus certificate) मिळवून नोकरी मिळवण्यासाठी सादर केलेल्या शिक्षकांचे धाबे सध्या दणाणले आहेत.
 पैसे भरून प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर शिक्षण संस्थेत पैसे भरून नोकरी मिळवली, आताही नोकरी गमावण्याची वेळ आली तर नोकरीच्या भरवशावर लग्न केले. घर मालमत्तेसाठी कर्ज काढले. मुलांना डोनेशन भरून चांगल्या शाळेत टाकले. नोकरी होती म्हणून सुशिक्षित बायको मिळाली. आता नोकरी गेली तर पुढे काय होणार, या चिंताक्रांत मानसिकतेतून सध्या राज्यातील बोगस प्रमाणपत्रधारक शिक्षक चिंतेत आहेत.
सध्या असे राज्यातले बोगस शिक्षक चिंताक्रांत झाले आहेत. नोकरीच्या जिवावर लग्न, मालमत्ता, घर, मुलांचे शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठा मिळवली. आताही सर्व प्रतिष्ठा धुळीत मिळवली जाणार आहे. अनेक मुलींच्या पालकांनी उमेदवारांना नोकरीच्या भरवशावरच मुली दिल्या. गलेलठ्ठ हुंडा काही ठिकाणी दिला गेला.
मात्र आता जावयाच्या नोकरीवर गंडांतर आले तर आपली मुलगी उपाशी राहू नये या चिंताक्रांत मानसिकतेत मुलीकडेच पालकही अस्वस्थ झाले आहे. हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्न सध्या समाजव्यवस्थेत नव्या समस्या निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रासारखे कल्याणकारी राज्य काय भूमिका घेणार, याकडे शिक्षण व्यवस्था चातकासारखी वाट पाहून आहे.
दरम्यान, संस्थाचालकांना नोसाठी दिलेले पैसे किंवा संस्था कृतज्ञता विकासनिधी आणि शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना अॅप्रोवलसाठी खाऊ घातलेले पैसे परत कसे मिळणार याची चिंता उमेदवारांना सतावत आहे. सध्या शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कोंदण बनून शिक्षण व्यवस्था संपवायला निघाला आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

प्रसिद्ध